मोदी सरकारला 8 वर्षे झाली, पण एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही; राज्यपालांकडून स्तुतीसुमने

मोदी सरकारला 8 वर्षे झाली, पण एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही; राज्यपालांकडून स्तुतीसुमने

पुणे जिल्हा परिषदेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले.

अमोल धर्माधिकारी | पुणे : पंतप्रधानांना 8 वर्षे झाली. मोदी सरकारला 8 वर्षे झाली. पण, एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हा अमृत काळ आहे, असे कौतुक राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. पुणे जिल्हा परिषदेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले.

मोदी सरकारला 8 वर्षे झाली, पण एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही; राज्यपालांकडून स्तुतीसुमने
महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केलंय : PM मोदी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, मी पुढच्या वेळी इथे येईल तेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्षही असतील, अशी अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये त्याला महत्व आहे. 1973 ला पंचायत राज आलं. पंचायतीच्या प्रमुखाला ताकद देण्याचे काम पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी केलं. प्रकल्प तसेच योजनांचा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होतो. यातून कामाला गती मिळाली. भ्रष्टाचार कमी झाला. लोकशाही बळकट झाली. पंतप्रधानांना 8 वर्षे झाली. या सरकारला 8 वर्षे झाली. पण एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचारचा आरोप नाही. हा अमृत काळ आहे, असेही कौतुक त्यांनी केले आहे.

देशात एक प्रकारे नवीन जागृती आली आहे. पंतप्रधान आवाहन करतात. सुरुवातीला काही प्रमाणात राजकारण, टीका होत असते. मात्र, पुढे त्याचा स्वीकार होतो. पंतप्रधानांनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केलं. तिरंगा हा केवळ पंतप्रधान मोदींचा नाही, भारतीय जनता पक्षाचा नाही. तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे. म्हणूनच आज सगळ्या घरांवर तिरंगा दिसतोय. तिरंगा फडकावल्यांनंतर आमच्या हातून कधी चुकीचे कृत्य होणार नाही. पुढील 25 वर्षांत आपल्याला देशाला जगद्गुरु बनवायचे असेल तर आम्हाला परिश्रम करावे लागतील. देशाप्रती निष्ठा बाळगावी लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मी पूर्वी पुण्यात येत होतो. तेव्हा सगळीकडे छान डोंगर, हिरवाई, टेकड्या दिसायच्या. जणू काही डेहराडूनमध्ये आल्यासारखे वाटायचं. मात्र, आता सगळीकडे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. मोठा विकास झाला आहे. लवकर पुणे नवी मुंबईपर्यंत पोहोचेल असे वाटते, अशी मिश्कील टीप्पणीही कोश्यारींनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com