Satara Udayan Raje Bhonsle
Satara Udayan Raje BhonsleTeam Lokshahi

लग्न सोहळा थांबवून वधू-वरांनी साजरा केला उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस

या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केल्याने कुतूहलाचा विषय बनला होता.

प्रशांत जगताप। सातारा: 24 फेब्रुवारी रोजी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. उदयनराजेंच्या वाढदिवस कार्यकर्त्यांकडून जोरदार पद्धतीने साजरी केला जातो. मात्र, यावेळी काही आगळंवेगळं पाहायला मिळाले. साताऱ्यात वधू-वराने लग्न सोहळा थांबवून भर लग्न सोहळ्यात उदयनराजेंचा वाढदिवस केक कापून साजरा केला.

चिंचणेर गावातील उदयनराजेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले दत्ता बर्गे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी नवदाम्पत्यांनी खासदार उदयनराजेंचा आज वाढदिवस असल्याने केक कापून लग्नसोहळ्याच्या ठिकाणी साजरा केला. या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केल्याने कुतूहलाचा विषय बनला होता. नवदाम्पत्याने उदयनराजेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी राजेंनी दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com