ठाण्याचे पालकमंत्री बेपत्ता; भाजपने व्यक्त केली नाराजी

ठाण्याचे पालकमंत्री बेपत्ता; भाजपने व्यक्त केली नाराजी

अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, सध्या ठाण्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करताना दिसून येत आहे.

विकास मिरगणे| ठाणे : राज्यामध्ये शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु, शंभुराज देसाई हे कधीतरी ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

ठाण्याचे पालकमंत्री बेपत्ता; भाजपने व्यक्त केली नाराजी
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ; फडणवीस यांची घोषणा

शंभुराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासोबत सातारा जिल्ह्याचीही पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. परंतु, शंभूराज देसाई ठाण्याचे पालकमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये येताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, सध्या ठाण्याचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करताना दिसून येत आहे.

यामुळे ठाणे जिल्ह्यातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असताना त्यांना पालकमंत्री देण्यात आलं नाही याबाबत भाजपने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांनी हे पालकमंत्री येत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची यांच्याकडे देण्यात यावा, असा आग्रह भाजपचा असल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com