खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं; गुलाबराव पाटलांचे राऊतांना आव्हान

खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं; गुलाबराव पाटलांचे राऊतांना आव्हान

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत थुंकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे

जळगाव : खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत थुंकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांंकडून संजय राऊतांविरोधात जोरदार आंदोलनं करण्यात येत आहेत. यावरुन शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांना थोडीफार लाज शरम असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावा. कोणी कोणाला थू केला हे लक्षात येईल, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे.

खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं; गुलाबराव पाटलांचे राऊतांना आव्हान
कसा झाला ओडिशा रेल्वे अपघात? रेल्वे बोर्डाने सांगितला घटनाक्रम

संजय राऊत यांना थोडीफार लाज शरम असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असे आवाहन गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊत यांच्या कृतीवरून किती खालच्या पातळीवर त्यांची संस्कृती आहे हे दिसत असून एकनाथ शिंदेंच्या 41 आमदारांनी संजय राऊत यांना मत देऊन निवडून दिलं. मात्र, आम्ही इतके नालायक आहोत तर आमची खासदारकी परत करा, असा निशाणाही त्यांनी संजय राऊतांवर साधला आहे. तर, संजय राऊत यांच्यासारख्या लोकांसाठी ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या खाटा वाढवले असल्याचा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com