बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार नसलो तरी...: गुलाबराव पाटील

बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार नसलो तरी...: गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांची दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर टीका

जळगाव : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटांने कंबर कसली असून जोरदार तयारी सुरु आहे. तर, शिवसेना आणि शिंदे गटाचे टीजर रिलीझ झाले आहेत. यामधून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसलो तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा घेत आहोत, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

दसरा मेळावा शिंदे गटाने हायजॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांचे सोनं हे दसऱ्याच्या दिवशी लुटलं जातं. त्यामुळे दरवर्षी बाळासाहेबांचा विचार मांडण्याचा आम्ही जो प्रयत्न करत आहेत. तोच प्रयत्न यावर्षीही करत असून आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसलो तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, दसरा मेळाव्याचे नियोजन करणे एवढेच काम बाकी असून जळगाव जिल्ह्यातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते हे मुंबईला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, बिग बॉसमध्ये जाण्याची सोन्यासारखी संधी मिळाली. तर निश्चितपणाने जाणार असून मागच्या काळात नाटकांमध्ये कायम भाग घ्यायचं. त्यामुळे बिग बॉसमध्ये बोलवल्यास नक्की जाऊ, अशई इच्छा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com