Gulabrao Patil : मी गिरीश महाजन यांच्यापेक्षाही मोठा आमदार

Gulabrao Patil : मी गिरीश महाजन यांच्यापेक्षाही मोठा आमदार

जळगावात मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
Published by :
Siddhi Naringrekar

जळगावात मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाच्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बरेच लोक साखरेच्या पोत्यावर बसतात पण त्यांना साखर खाता येत नाही. म्हणून खेड्यापाड्यात एक अशी म्हण आहे की, पाणी वाहतं ठेवलं पाहिजे, पाणी वाहतं ठेवलं की, डेंग्यू होत नाही, डास होत नाही आणि नवं पाणी येत राहतं.

तसेच ते पुढे म्हणाले की, गिरीशभाऊंनी शेअर्स घेतले मला माहीत आहे. यांची नावं आहे माझ्याकडे, बाकीच्यात काय नावं आहेत मी बोलणार नाही. गिरीशभाऊंपेक्षा फार मोठा आमदार आहे मी. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील मला काही घेणं देणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती भेटतात. मी स्वतःला खूप मोठा आमदार समजतो. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com