आदित्य ठाकरे माझे मुलाच्या वयाचे...; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे माझे मुलाच्या वयाचे...; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेतून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. याला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मंगेश जोशी | जळगाव : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेतून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. गुलाबराव पाटील हे सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे बोलतात रात्री का वेगळे बोलतात हे सर्वांना माहिती आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे माझ्या मुलाच्या वयाचे त्यांच्यावर बोलण्याची गरज वाटत नाही, असा टोला पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

आदित्य ठाकरे माझे मुलाच्या वयाचे...; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
'राज ठाकरे यांची पूर्वीची भाषण करण्याची स्टाईल आता राहिली नाही'

गद्दारांना लाथ मारून बाहेर काढा, असे वक्तव्य सुभाष सरदेसाई यांनी महाड येथील सभेत केले होते. यावरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. ज्यांनी आपले विचार, झेंडा तसेच पक्षप्रमुख सोडले त्यांना गद्दार म्हटलं जातं, असा पलटवार गुलाबराव पाटलांनी सुभाष सरदेसाईंवर केला आहे. तर, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालत आहोत. आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहोत. आम्ही भगवा सोडलेला नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com