'संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ उध्दव ठाकरेंनी ओढावी'

'संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ उध्दव ठाकरेंनी ओढावी'

गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

जळगाव : गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही, असे शरसंधान उध्दव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत शिंदे गटावर साधले. यावर आज शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ यांनी ओढवी एवढंच या राज्यात चाललंय, असा जोरदार टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

'संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ उध्दव ठाकरेंनी ओढावी'
मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित महिलांना प्राधान्य; मुंबई महापालिका सूत्र

संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ यांनी ओढवी एवढंच या राज्यात चाललं असून झालेली गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे राज्याने काय केलं पाहिजे याचे मार्गदर्शन होण्याची उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याकडे मुद्देच नसल्याची टीका गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. भगवा ही कोणाची प्रॉपर्टी नसून त्याच्यावर कोणीही हक्क दाखवू नये. शिवधनुष्य कोणाला पेलवेल हा येणारा काळच दाखवेल, असा निशाणाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

खंडोजी खोपड्याची औलाद आहेत. गद्दारी करून भगवे झेंडे हातात नाचवता आहे. तुम्ही तुमच्या हाताने गद्दार हा शिक्का कपाळावर मारून घेतला आहे. निरमा पावडर आहे शुद्ध करतो. म्हणून हे सगळे गुजरातला गेले वशिंग मशीनमध्ये धुवून आणले. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला. राजकारणातल्या आईच्या कुशीवर वार करणारे हे चोर धनुष्यबाण घेऊन फिरणार आहेत. रावणाला शिवधनुष्य पेलले नाही. ते यांना काय पेलवणार, असा घणाघात उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com