...तर ॲक्शनला रिएक्शन येणारच सभेत; शंभुराज देसाईंचा ठाकरे गटाला इशारा

...तर ॲक्शनला रिएक्शन येणारच सभेत; शंभुराज देसाईंचा ठाकरे गटाला इशारा

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होत आहे. परंतु, त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सातारा : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होत आहे. परंतु, त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभा उधाळण्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. अशातच, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. पाचोरा सभेत काही चुकीचे बोलले गेले तर ॲक्शनला रिएक्शन येणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे.

...तर ॲक्शनला रिएक्शन येणारच सभेत; शंभुराज देसाईंचा ठाकरे गटाला इशारा
गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला दानवेंचे प्रतिआव्हान; शिंदे गटाच्या सभा होतील, मग तुम्ही बघाच

पाचोरा सभेत काही चुकीचे बोलले गेले तर ॲक्शन ला रिएक्शन येणारच सभेत. राऊतांच्या फक्त तोंडात दम आहे, अशी जोरदार टीकाही शंभूराज देसाईंनी केली आहे.

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर शंभूराज देसाई म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना राष्ट्रवादीला बहुमत असताना अजित दादांना मुख्यमंत्री पदापासून कोणी रोखलं त्याच वेळेला अजित दादा मुख्यमंत्री होऊ शकले असते. दादा डोईजड होतील म्हणून मुख्यमंत्री पद घेत नाही. त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, सध्याचे राजकारण पाहता मला भीती वाटते. टेन्शन येते, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले होते. यावर शंभूराज देसाई म्हणाले, ताईंना कसली भीती वाटते माहिती नाही. कसल्याही भुकंपाला समोरी जाण्याची ताकत शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com