कसबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा हेमंत रासनेंना उमदेवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत

कसबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा हेमंत रासनेंना उमदेवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत

कसबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा हेमंत रासनेंना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कसबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा हेमंत रासनेंना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहेत. कसबा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासनेंचा काही मतांनी पराभव झाला होता.

पोटनिवडणुकीतील पराभवनंतर देखील हेमंत रासनेच भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहेत. सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कसबा मतदारसंघात महाराष्ट्रातील नमो चषक स्पर्धेच्या नोंदणीचे केले उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

देशभरात "नमो चषका"चे आयोजन करण्यात येत असून काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कसबा मतदारसंघात महाराष्ट्रातील नमो चषक स्पर्धेच्या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. भाजपने कसबा पेठ विधानसभा मतदार विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com