मी विहिरीत जीव देईन, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, गडकरींनी सांगितला किस्सा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल नागपुरामध्ये एका उद्योजकांच्या समिटमध्ये बोलत असताना जुना किस्सा सांगितला आहे. या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नितीन गडकरी यांनी विद्यार्थी दशेत असताना मित्रासोबतचा किस्सा सांगितला.
त्यावेळी ते म्हणाले की, स्टुडन्ट लीडर असताना माझे मित्र श्रीकांत जिचकार होते.जिचकार मला एक दिवस म्हणाले, तू एक चांगला माणूस आहेस. एक चांगला राजकारणी आहे. पण तू एका चांगल्या पक्षात नाही.
तेव्हा मी म्हणालो की, तेव्हा त्यांना विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही असे स्पष्ट नकार दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, तेव्हा आमचा पक्ष निवडणूक हरायचा. माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं की, युद्धभूमीवर हरल्यावर ती संपत नाही. पण युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतो. तुम्हाला यश मिळते त्याचा आनंद फक्त तुम्हा एकट्याला होतो. तेव्हा त्याचा काही अर्थ नसतो. पण तुम्हाला जेव्हा यश मिळते आणि त्याचा आनंद तुमच्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या सोबत काम करणाऱ्या लहानांपासून मोठ्यांना होतो, तेव्हा त्याला जास्त महत्त्व असतं. संपर्क खूप गरजेचा असतो.मानवी संबंध ही मोठी ताकद असते. राजकारण आणि उद्दोगामध्ये तर हे जास्त महत्वाचे असते. एकदा पकडला त्याचा हात पकडून ठेवा. तुमचे दिवस चांगले असू की वाईट, परिस्थितीनुसार बदलू नका. अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली.