बैठकांचे सत्र! भाजप, शिवसेना, बंडखोर आमदारांची आज महत्वाची बैठक

बैठकांचे सत्र! भाजप, शिवसेना, बंडखोर आमदारांची आज महत्वाची बैठक

बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष

मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), बंडखोर आमदार (Shinde Group) यांच्या आज बैठकांचे सत्र होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. म्हणूनच आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.

बैठकांचे सत्र! भाजप, शिवसेना, बंडखोर आमदारांची आज महत्वाची बैठक
शिवसेना आक्रमक; एकनाथ शिंदेंसह 15 बंडखोरांवर होणार कारवाई?

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी शिंदे गट चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. या बैठकीत माध्यमांसमोर आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमधून गट प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. लवकरच या प्रवक्त्यांची नावं जाहीर करण्यात येतील, असेबी समजत आहे.

शिवसेनेचीही आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर, आज संध्याकाळी साडेसहा वाजता आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

शिंदेंच्या बंडाळीनंतर शांत असलेली भाजप अनेक दिवसांनंतर सक्रीय झाल्याची दिसून येत आहे. यानुसार आज भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील, अशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सध्याच्या राजकारणाविषयी देखील यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com