औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? इम्तीयाज जलील म्हणाले...
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यानंतर काल केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच, एमआयएमआयएमचे इम्तीयाज जलील यांनीही प्रतिक्रिया दिली असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यात आले. नामाताराणावरून सरकार राजकारण करत असून इतिहास चांगला किंवा वाईट होऊ शकतो. परंतु शहराचे नाव बदलून काय उपयोग होणार आहे का ? शहरातील प्रश्न बदलणार आहे का? लोकांना विश्वासात न घेता हे नामकरण करण्यात आले असून, आम्ही सुप्रीम कोर्टात असताना हा निर्णय दिला. याबद्दल कोणताही पक्ष बोलत नाही. मी कॉग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे देखील निषेध करत असल्याची इम्तीयाज जलील यांनी भावना व्यक्त केली
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी गेले होते. तर, एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. सरकार फडणवीस आणि अमित शाह चालवत आहेत, असा निशाणाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.