आगमी काळात राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील; मनसे नेत्याचा मोठा दावा

मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेकडं सर्वांचंच लक्ष लागले आहे.

मुंबई : मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. या मनसेच्या वर्धापनदिनाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. 'नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज' असे ब्रीदवाक्य या टीझरमध्ये आहे. तर, वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेकडं सर्वांचंच लक्ष लागले आहे. अशातच, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मोठा दावा केला आहे.

अमेय खोपकर म्हणाले की, 9 मार्च म्हणजे सर्व मनसैनिकांसाठी एक सण असतो. मनसेला 17 वर्ष पूर्ण झाले यावर विश्वास बसत नाही. यामध्ये अनेक चढ-उतार बघितले. पण, आता प्रत्येक मनसैनिकांना आत्मविश्वास आहे की आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत. आणि राज ठाकरे उत्तुंग भरारी घेतील. आगमी काळात महाराष्ट्रामध्ये मनसेचा झेंडा फडकेल आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी म्हंटले आहे. अमेय खोपकरांच्या विधानाममुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com