नांदेडमध्ये मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीन फोडली; मतदान केंद्रावर बेरोजगार तरुणाचा राडा

नांदेडमध्ये मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीन फोडली; मतदान केंद्रावर बेरोजगार तरुणाचा राडा

देशात दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जागांसाठी मतदानाचा हक्क बजावला जात आहे.

देशात दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जागांसाठी मतदानाचा हक्क बजावला जात आहे. तसेच अनेक ठिकाणहून किरकोळ वादाच्या घटना समोर येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एका संतप्त वक्तीने मतदान केंद्रात घुसून व्हीव्हीपॅट मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडूने फोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.येथील एका मतदान केंद्रावर चक्क कुऱ्हाडीचा घाव घालून ईव्हीएम मशीनचे दोन तुकडे करण्यात आले. भानुदार एडके असे या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे या व्यक्तीने जे मशीन फोडलं त्यात 500 मतदान नोंदवण्यात आलं होतं. परंतु ईव्हीएमचं कंट्रोल यूनीट सुरक्षित असल्याने झालेलं सर्व मतदान देखील सुरक्षित आहे असा दावा मतदान कर्मचाऱ्यांनी केला आहे. या व्यक्तीने मतदान केंद्रावर हल्ला केल्यानंतर सर्व यंत्राणा अस्ताव्यस्त झाली होती. पोलिसांनी पोलिंग बुथवर हल्ला करणाऱ्या भानुदार एडके याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची पक्रिया सुरू आहे.

देशात सध्या विरोधकांकडून ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातो. ईव्हीएम मशिनचा गैरवापर करुन भाजपा सत्तेत येत असल्याचाही आरोप अनेकदा होतो. त्यामुळे, ईव्हीएम मतदानाला विरोध करत, मतपत्रिका छापून मतदान घेण्याची मागणीही विरोधकांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता संतप्त तरुणाने कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएम मशिनचे तुकडे केले.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 26 एप्रिल रोजी पार पडले. एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्ये आणि 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 109 मतदारसंघात मतदान झाले. लोकसभेच्या शेवटचा आणि सातवा टप्पा 1 जून रोजी असून त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. 4 जूनला जनतेने कोणते सरकार निवडले हे कळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com