सत्ता नसताना विरोधकांनी त्रास दिला; नितीन गडकरींचा आरोप

सत्ता नसताना विरोधकांनी त्रास दिला; नितीन गडकरींचा आरोप

नितीन गडकरींचा विरोधकांवर घणाघात

कल्पना नालस्कर | नागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये भारतीय जनता मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमी विकासाचा राजकारण करतात. पण, सत्ता नसताना विरोधकांनी बराच त्रास दिला काम होऊ दिले नाही, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे नागपूर जिल्हा ग्रामीण वतीने विस्तारीत कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा करण्याकरीता अहोरात्र परिश्रम केले, त्यांचा त्याग विसरून चालणार नाही. याकरीता जुन्यांचे सहकार्य व नविन लोकांना सोबत घेउन पूर्ण ताकतीने जिल्ह्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत करावे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता सर्वदूर होती. पण, मधील काळामध्ये काही ठिकाणी भाजप सत्तेतून बाहेर पडली. नागपूर शहरात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुणी काही म्हटलं तरीही भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आलं. त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा उपयोग करून संघटनेची ताकद वाढवण्याची आणि मजबूत करण्याची गरज आहे. जरी आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी भारतीय जनता पक्षाचे विशिष्ट राहिले आहे. भाजपचे कार्यकर्ते-नेते कधीही सत्तेच राजकारण करत नाही. सेवेचे आणि विकासाचे राजकारण करतात आणि त्या भागातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात.

तर, आपण ज्या जिल्हा परिषद, नगरपंचायतमध्ये आहोत. तिथल्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आपल्यावरती आहे. निवडणुकांमध्ये हरलो तर उमेदवार बदलतात. कुठे आमदार बदलतात. पंचायत समितीचे उमेदवार बदलतात. त्याच कारण म्हणजे जेव्हा लोक आपल्याला फिडबॅक देतात. आमच्या ज्या अपेक्षा होत्या. पार्टीला सपोर्ट केला. पण, यांनी आमची काम केली नाही. यामुळे काम करण्यामध्येही अनेक अडचणी येत होत्या. आपल सरकारावेळी असणारी अनुकूलता आणि सरकार नसताना असणारी प्रतिकूलता याची पण अडचण आहे. जे आपले विरोधक होते त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केला. त्यांची कामे होऊ दिली नाही, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे. त्यामुळे अनेक लोकांना उपहास आणि अपमान सहन करावा लागला. हा जो प्रवास आहे हा जो संघर्ष आहे चालत राहणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ज्यांनी आपल्याला मतं दिली त्यांचाही काम करणं व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आपल कर्तव्य आहे. पण, ज्यांनी आपलं काम केलं नाही. ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं. जे आपल्याबद्दल चांगलं बोलत नाही. त्यांची काम करून त्यांचे मन बदलणं आणि आपल्या सोबत घेणं हाच राजकारणात प्रयत्न केला पाहिजे. मदत केली नाही म्हणून दुश्मनी करू नका कारण निवडणूक आपल्याला लढवायची आहे. त्यांनाही लढवायची आहे म्हणून जोडण्याचा राजकारण आपण जिल्ह्यात करू, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

राजकारणात जोडण्याचं काम करा हे सांगताना गडकरी यांनी एक उदाहरण दिलं की, गाईचं शेण कुठेही फेकलं तरी त्याला मातीचे कण चिकटतात. तसेच काही लोक असतात त्यांना कुठेही टाकलं तरी त्यांना लोक चिकटतात. पण, काही असतात त्यांना कुठेही फेका काही फरक पडत नाही. एकही कण चिटकत नाही, अशी उपहासात्मक टीका देखील त्यांनी केला.

Lokshahi
www.lokshahi.com