मुंबईत बैठकांचं सत्र; इंडिया आघाडी आणि महायुतीची आज बैठक
इंडिया आघाडीची आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तसेच महायुतीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.
इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये होणार आहे. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. देशभरातील 28 पक्षाचे नेते आणि आजीमाजी मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरणार आहे.