Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleel Team Lokshahi

औरंगाबादच्या नामांतराला जलिल यांचा विरोध; आजपासून साखळी उपोषणाला सुरूवात

विविध राजकीय संघटनांनी देखील जलील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली. एकीकडे या नामांतराचे स्वागत केले जात आहे. तर दुसरीकडे आता या निर्णयाला विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून सर्वाधिक विरोध खासदार इम्तियाज जलील केला. त्यातच आज त्यांनी शेकडो नागरिकांनी या नामांतराविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.

Imtiyaz Jaleel
देशात बदलाचे वारे, शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले...

साडेबारा वाजेच्या सुमारास जलील त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी देखील याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच त्याठिकाणी 'आय लव औरंगाबाद' नावाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर इतर राजकीय संघटनांनी देखील जलील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. हे उपोषण किती दिवस चालेल याबाबत काही माहिती नसल्यामुळे पोलिसांनी देखील काळजी घेतली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी देखील उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com