Jayant Patil | Ajit Pawar
Jayant Patil | Ajit PawarTeam Lokshahi

सत्यजित तांबेंना राष्ट्रवादीने केली मदत? अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काहींनी सत्यजीत यांना मदत केली असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले होते. यावरुन राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झााल आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

Jayant Patil | Ajit Pawar
'कसबा-पिंपरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार'

आम्ही अजित पवार यांची मुलाखत पाहिली नाही. त्यांच्या विधानाचा असा अर्थ असू शकत नाही. आम्ही नाशिकमध्ये मविआ म्हणून लढलो. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांनी चिरंजीव यांना तिकीट दिलं. त्यामुळे थोडा लोकांमध्ये गोंधळ झाला, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

तर, काल विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला त्यात मविआचे उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रात काय स्थिती आहे हे या निकालात दिसून आले. शेकापच्या बाळाराम पाटील यांचा प्रचार मविआने जोरदार प्रचार केला. धनशक्तीचा जोरदार वापर करण्यात आला, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, शिवसेना फुटीबद्दल अजित पवार यांनी बोललं आहे. शरद पवार यांनी पक्षातील कुणकुण उद्धव ठाकरे साहेबांना सांगितली होती. पण, उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास ठेवला. पण, त्यांनी विश्वासघात केला, असेही जयंत पाटलांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com