हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे नाही तर बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे : जयंत पाटील

हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे नाही तर बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे : जयंत पाटील

जयंत पाटील यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका

मुंबई : हे सरकार शेतकर्‍यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर बोलताना केली. या सरकारची जाहिरातच अशी आहे 'निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान' परंतु गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्राची प्रगती खुंटू लागली आहे हे चित्र ८-९ महिन्यातील आहे. मुख्यमंत्री नेहमी तुम्ही काहीच केले नाही बोलतात अडीच वर्षे तर ते आमच्या सरकारमध्ये होते. सरकारमध्ये आमच्या शेजारी बसायचे आणि तेच बोलत आहेत आम्ही काही केले नाही. हे म्हणणे योग्य नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे नाही तर बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे : जयंत पाटील
सदानंद कदमांना अनिल परबांनी फसवलं, आत टाकायचे तर...: रामदास कदम

आर्थिक पाहणीमध्ये 'निर्णय वेगवान सरकार गतीमान' मागील वर्षात ४० टक्के डीपीडीचा खर्चच केला नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक किती झाली २०२० मध्ये ४४ हजार २८८ कोटी २०२१ मध्ये २ लाख ७७ हजार कोटी रुपये झाली. २०२२ मध्ये ३५ हजार कोटी पर्यंत पोचलो गुंतवणूकीमध्ये गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर गेले. कर्नाटक दुसर्‍या क्रमांकावर आणि महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. तुम्ही सुरतेला गेला नसता तर गुजरात आणि कर्नाटकच्या पण पुढे राहिलो असतो, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत अमुकतमुक केले सांगत आहेत. मात्र, या आठ ते नऊ महिन्यात महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी सरासरीने आत्महत्या करत आहेत. मागच्या तिन्ही सरकारमधील शेतकरी आत्महत्यांची संख्या सरासरी पाहिली तर २०१४-१९ या पाच वर्षांत पाच हजार ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१९-२१ या अडीच वर्षात १६६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या नऊ महिन्यात एक हजार २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र पाहिले तर तुमचे सरकार आले आणि महाराष्ट्रावर विघ्न आले, असे बॅनर लावायची पाळी आली आहे, अशी घणाघाती टीकाही जयंत पाटील यांनी केली.

अर्थसंकल्प कुणाचाही असो त्याला इलेक्शनचा वास असतो हेच सत्य ठसवण्याचा विरोधकांचा हट्टाहास असतो... इलेक्शनच्या केंद्रबिंदू भोवती अर्थ आणि संकल्प फिरला जातो सामान्य माणसाचा खिसा तर सगळ्याकडून मारला जातो' ...हीच भावना महाराष्ट्रात आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहतोय. भाव लपवण्याची पध्दत आता त्यांनी आत्मसात केली आहे त्यांच्यासाठी काही ओळी 'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो... आखों मे नमी, हसी लबों पर, क्या हाल है जो दिखा रहे हो.. तुम इतना जो मुस्करा रहे हो.. या गाण्याच्या ओळीतून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील खंत व्यक्त केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस किंगमेकर होतील असे वाटले होते पण किंगमेकर तर दिल्लीत बसले आहेत दोन नंबरचे आहेत. दिल्लीला गेल्याशिवाय काही मिळत नाही. मात्र कितीही घोषणा केल्या तरी जनतेला भुरळ पडणार नाही, असेही जयंत पाटील शेवटी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com