Jayant Patil : विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती मात्र अजित पवारांमुळे संधी हुकली

Jayant Patil : विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती मात्र अजित पवारांमुळे संधी हुकली

जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांमुळे विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकली. त्यावेळी विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती मात्र अजित पवारांनी दावा केल्याने माघार घ्यावी लागली. असं जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदावरील नाराजीनाट्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यासोबतच अजित पवारांसोबत आपले चांगले संबंध आहेत मात्र एवढ्यात त्यांची भेट झाली नसल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आले होते.

माझी विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती मात्र अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितल्याने माघार घेतली असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com