Jayant Patil : “अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”

Jayant Patil : “अमोल कोल्हे, डरने की कोई बात नहीं”

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिर्डीत 2 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिर्डीत 2 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीचे वर्ष हे संघर्षाचं वर्ष. पक्ष फुटल्यामुळे मागच्या फळीतील लोक पुढं आले. त्यांना मागच्या फळीतून पुढच्या फळीत येऊन बसण्याची संधी मिळाली.

तुमच्या सर्वांचे प्रमोशन झालं त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला शुभेच्छा देतो. नाहीतर तुम्हाला काय पुढे येऊन बसायची संधी नव्हती. त्यामुळे पुढे बसलेल्या सर्वांनी गेलेल्यांचे आभार माना. शरद पवारांची साथ न सोडता काम करण्याचं ठरवलं आहे. दोन दिवसाच्या शिबिरात देशाची परिस्थिती काय हे समोर आणणार. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला.

आपलं काम इतरांपेक्षा सोपं आहे. जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आपण ताकदीने काम करायला हवं. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काहीजण उचलायला लागलेत. अमोल कोल्हे सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे. जनता आपला निर्णय घेत असते. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com