Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जाणार? जयंत पाटील म्हणाले...

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जाणार? जयंत पाटील म्हणाले...

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला.
Published by  :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार हे महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं. तर त्यामध्ये वावगं नाही. जे आमच्यातून गेलेले आहेत. त्यांचा दावा आपण टीव्हीवर बघितला असेल. त्यांना निवडणूक आयोगाने कबुल केलेलं दिसतेय की, चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे जाणार. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णय जर आधीच झाला असेल तर सुप्रीम कोर्ट हाच त्यावरचा उपाय आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं तर महाराष्ट्रातील जनता हे मान्य करेल असं मला वाटत नाही आणि मोठ्या रोषाला भाजपाला सामोरे जावं लागले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com