Jitendra Awhad in Vartak Nagar Police Station
Jitendra Awhad in Vartak Nagar Police StationTeam Lokshahi

आव्हाडांची आजची रात्र पोलिस चौकीतच जाणार

आज सायंकाळी 5 वाजता आव्हाडांना न्यायालयात हजर करणार असल्याचे वृत्त होते मात्र आता आव्हाड यांची आजची रात्र वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्येच जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

'हर हर महादेव' हा चित्रपट मागचे काही दिवस राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधवांनी हा शो पुन्हा सुरू करायला लावला होता. दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह 11 कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचंही वृत्त आहे.

Jitendra Awhad in Vartak Nagar Police Station
अफजल खानाच्या कबरीवरील बांधकामाचा चबुतरा जमीनदोस्त केल्यानंतर अशी दिसते ही कबर! पाहा EXCLUSIVE फोटोज

आज सायंकाळी 5 वाजता आव्हाडांना न्यायालयात हजर करणार असल्याचे वृत्त होते मात्र आता आव्हाड यांची आजची रात्र वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्येच जाणार असल्याची माहिती मिळते आहे. तर, उद्या दुपारी 3 च्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे.

वर्तकनगर पोलिस स्टेशनबाहेर बंदोबस्त वाढवला:

जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतल्यानंतर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये आव्हाड आहेत तर, पोलिस स्टेशनच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता आता वर्तक नगर पोलिस स्टेशनबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com