माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं, पण...; जितेंद्र आव्हाड भावूक

माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं, पण...; जितेंद्र आव्हाड भावूक

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं असत. पण, विनयभंग खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं, पण...; जितेंद्र आव्हाड भावूक
आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जयंत पाटील ठाण्यात; म्हणाले, जाणीवपूर्वक मुद्दामहून अडकवलं...

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सर्व गुन्हे मला मान्य झाले असते. पण, हा गुन्हा मला मान्य नाही. खून व इतर गुन्हे माझ्यावर चालले असते. समाजामध्ये माझी मान खाली जाईल अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले. माझ्या पोरीला तिच्या मैत्रीणी विचारतात, असे सांगताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले आहे. यावेळी आव्हाड यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

उपजीविकेच्या साधनेत मी अडथळा आणला, असं कलम माझ्यावर गेल्या गुन्ह्यात माझ्यावर लावण्यात आले होते. गुन्हा दाखल करण्यासाठी सतत पोलिसांना फोन केले जातं होते. मला रात्रभर कार्यकर्त्यांसोबत लॉकअप मध्ये राहावं लागले.

माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं, पण...; जितेंद्र आव्हाड भावूक
सत्तार बोलले तो विनयभंग नाही का? सुळेंचा शिंदेंना सवाल; तुमच्या आमदाराचे सौ गुन्हे माफ का?

35 वर्ष मी साहेबांबरोबर फिरतोय. पण, इतकं घाणेरडं राजकारण आम्ही कधी केले नाही. लॉकअप मध्ये राहायला आम्ही घाबरत नाहीत. पण, असे खोटे गुन्हे दाखल करुन आम्ही माफी मागू, असे वाटत असेल तर आम्ही मागणार नाही. माझ्या खुनाबद्दलचे प्लॅनिंग झालं असत तरी चाललं असत. पण, विनयभंग खपवून घेणार नाही, असे देखील त्यांनी म्हंटले आहे. तसेच, माझ्या खुनाचे प्लॅनिंग देखील त्यांनी केले होते, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. पण, आम्हाला पक्षातील सर्वांना जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा नकोय. ते महाराष्ट्र विधानसभा आणि राज्यातील एक उभरते नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com