NCP :  पाटी लावली, पाटी काढली; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची पाटी काढली

NCP : पाटी लावली, पाटी काढली; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची पाटी काढली

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षणाचा मुद्दा, आरोग्य विभागातील कथित घोटाळा, ड्रग्जच्या कारवाया, अशा अनेक मुद्द्यांवरुन या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या एक दिवस आधी विधानसभा अध्यक्षांनी कार्यालय अजित पवार गटाला दिलं. कार्यालयावर दादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्याने शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट लावण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता संघर्ष होण्याची शक्यता आहे.

आजपासून पुढचे 10 दिवस नागपूरात हे हिवाळी अधिवेशन सुरु असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काल चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावर पत्रकार परिषदेतून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. असे म्हणत फडणवीसांनी जोरदार टोला लगावला. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधारी कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

NCP :  पाटी लावली, पाटी काढली; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची पाटी काढली
NCP : राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही गटाच्या नेत्यांची नेमप्लेट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com