राजकारण
Jitendra Awhad : लोकशाहीचे कमलेश सुतार यांच्यावर सुडबुद्धीच्या भावनेतून गुन्हा दाखल
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्य सरकारच्या किंवा त्यांच्या एखाद्या नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं की,त्याच्यावर प्रचंड वेगाने गुन्हा दाखल करायचा,ही या सरकारची खोड आहे.आणि हे मी स्वतः मागील वर्षभरात अनेकवेळा अनुभवाल आहे. लोकशाहीचे कमलेश सुतार यांच्यावर देखील अश्याच पद्धतीने सुडबुद्धीच्या भावनेतून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा मी निषेध करतो. कमलेश आम्ही तुझ्या सोबत आहोत. असे आव्हाड म्हणाले.