फोटो ट्विट करत आव्हाड यांनी साधला अण्णा हजारेंवर जोरदार निशाणा

फोटो ट्विट करत आव्हाड यांनी साधला अण्णा हजारेंवर जोरदार निशाणा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करत अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे.

अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांचं केंद्रात सरकार असताना मोठं जन आंदोलन केलं होते. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आंदोलन केली आहेत. आता मात्र भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे काहीच बोलत नाही अशा चर्चा आहेत.

फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com