... तर अख्खा कोकण देशद्रोही आहे का? आव्हाडांचा सरकारला सवाल

... तर अख्खा कोकण देशद्रोही आहे का? आव्हाडांचा सरकारला सवाल

कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक कडाडून विरोध करत आहेत. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक कडाडून विरोध करत आहेत. रिफायनरीविरोधात स्थानिकांनी अनेकदा आंदोलनही केले होते. या मुद्याचे आज अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अख्खा कोकण विरोध करत आहेत ते देशद्रोही आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

... तर अख्खा कोकण देशद्रोही आहे का? आव्हाडांचा सरकारला सवाल
Rahul Gandhi : राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळाली....सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती

नाणारला स्थानिकांनी विरोध केला. अख्खा कोकण बारसूला विरोध करत आहे. कोकणाचे नैसर्गिक सबंध आहे. असे रिफायरीचे प्रोजेक्ट्स आले तर कोकणात मासेमारी राहणार नाही. 40 हजार लोक मासेमारीचे काम करत आहेत. एखादा माणूस एकदा ध्येयाने विरोध करत असेल तर तो विरोध का करतो हे लक्षात घ्यायला हवे. विरोध करणारी सर्व व्यक्ती देशद्रोही आहे का? अख्खा कोकण विरोध करत आहेत ते देशद्रोही आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

आंदोलन करणाऱ्यांचे फॉरेन फंडिंग असेल तर तशी तिकीट द्या. हे प्रकल्प दुसरीकडे कुठेही आणा तुम्हाला समुद्र किनारा का हवा? कोकणातील संपूर्ण मासेमारी नष्ट या रिफानरीमुळे नष्ट होईल. कोकणातील सौंदर्य नष्ट होईल आणि 30 ते 35 वर्षांनी कोकण ओसाड होईल, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, बेडेकर कॉलेजमधील व्हायरल व्हिडीओवरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. हे का घडलं हे कळत नाही. डॉ. बेडेकर यांनी याची सत्यता पहावी. एनसीसी विद्यार्थ्यांना असे फटके देणे चुकीचे आहे. सोमवारी मी त्या कॉलेजला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com