Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

...तर त्यांना मी गोळ्या घातल्या असत्या; पुण्यातील 'त्या' घटनेवर आव्हाड संतप्त

पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे.

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. एका 27 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या मासिक पाळीतील रक्त कापसाने जमा करून तिच्या सासरच्या मंडळींनी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचे पडसाद आज विधीमंडळात देखील उमटले. यावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad
धक्कादायक; मासिक पाळीच्या रक्ताची विक्री ? ती ही पुण्यात ?

दुर्दैव आहे की सभागृहात बोलू दिलं नाही. संवेदनशील विषय आहे. महिलेला हात पाय बांधून तिचं कापसातून रक्त टिपलं. पीडिता आधी बीडला होती त्यानंतर ती पुण्याला आली. पुण्यात 7 दिवस पीडिता तक्रार करण्यासाठी पोलिसांच्या मागे लागली होती. ती जर माझी बहिण असती आणि जर तिचे हात पाय बांधून जर कोणी असं केलं असतं तर त्यांना मी गोळ्या घातल्या असत्या. असंच होणार. जर पोलीस कारवाई मारणार नसतील तर असंच होईल. अशा प्रथा रोखण्यास आपण अपयशी ठरलोय, असा संताप आव्हाडांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, 27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहण्यास असून दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेली. तिच्या मासिक पाळी दरम्यान सासरच्या मंडळीने तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते बाटलीत भरुन ५० हजारात जादुटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com