राजकारण
जयंत पाटील असू द्या किंवा...भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आव्हाड म्हणाले...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला केवळ एवढंच म्हणायचे की, कुणीतरी जाणून-बुजून या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतंय. काही ब्लॉगर्स आहेत. ज्यांच्याकडून जयंत पाटील आणि माझ्याविषयी या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय.मी कायम शरद पवार साहेबांसोबतच आहे.
जयंत पाटील असू द्या किंवा मी स्वतः असू द्या मी शरद पवारांसोबतच राहील. मरेपर्यंत मी शरद पवार यांच्या सोबतच राहील. मी शंभर टक्के सांगतो की आम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही. असे आव्हाड म्हणाले.