BJP President JP Nadda
BJP President JP NaddaTeam Lokshahi

जे.पी नड्डांच्या कार्यकाळात वाढ, 2024 पर्यंच नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत. त्याआधी याच वर्षात 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. आता या सर्व निवडणुका जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जाणार आहेत.
Published by :
Sagar Pradhan

दिल्लीत सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनमधून आता मोठी घटना समोर आली आहे. भाजपचे सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात वाढ करण्यात आली आहे. नड्डा 2024 पर्यंत पक्षाचे नेतृत्व करणार आहेत, म्हणजेच लोकसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. असा निर्णय या अधिवेशनात झाला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे.

BJP President JP Nadda
तब्बल सव्वा दोन तासानंतर देशमुखांची एसीबीकडून चौकशी संपली

गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, हा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत मांडला होता आणि तो भाजपच्या कार्यकारिणीने स्वीकारला होता. आपल्या घटनेनुसार संघटना निवडली जाते. हे वर्ष सभासदत्वाचे वर्ष आहे, कोविडमुळे सभासदत्वाचे काम वेळेवर होऊ शकले नाही, त्यामुळे घटनेनुसार कामाचा विस्तार करण्यात आला आहे. अशा स्थितीत राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला, एकमताने पाठिंबा मिळाला. आता नड्डा जी जून 2024 पर्यंत अध्यक्ष राहतील.

ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना बिहारमध्ये आमचा स्ट्राइक रेट सर्वाधिक होता, एनडीएला महाराष्ट्रातही बहुमत मिळाले. यूपीतही जिंकलो, बंगालमध्ये आमची संख्या वाढली. गुजरातमध्ये आम्ही दणदणीत विजय मिळवला. ईशान्य भागातही काम केले. असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com