election
election

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानास सुरुवात

महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठित बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.

पुणे : महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठित बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणेकर कोणाला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

election
रविंद्र धंगेकरांची उमेदवारी होणार रद्द? भाजप आक्रमक

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतर्फे कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राज्यातीलही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे मोठे नेते पुणे आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून बसले होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, रोड शोवर भर देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. या पोटनिवडणुकीचा प्रचार भाजप आणि मविआच्या आरोप-प्रत्यारोपांनी तसेच, गौप्यस्फोटांनी गाजला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com