KDMC | garbage
KDMC | garbage team lokshahi

केडीएमसीत अधिकाऱ्यांची मनमानी, धक्कादायक बाब समोर

धक्कादायक बाब समोर
Published by :
Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आधारवाडी डंपिंगच्या पायथ्याशी दुर्गाडी चौकात कचरा टाकू नये, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई कली जाईल अशा इशारा देणारा फल महापालिकेने लावला आहे. त्याच ठिकाणी महापालिका कचरा टाकून डंपिंगच्या शेजारीच मिनी डंपिंग करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (KDMC only dumps garbage at the places where no littering is posted)

KDMC | garbage
बिहारमध्ये भाजपचे 'मिशन 35' काय? सीमांचलमधून अमित शहा वाजवणार बिगुल

शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. दुर्गाडी चौकात बस स्टॉप आहे. तसेच हा रस्ता प्रमुख रस्ता आहे. डंपिंगच्या ग्राऊंडच्या पायथ्याशी आहे. गणोश विसजर्न घाटाकडे जाणारा मार्ग याच रस्त्याने जातो. गणपतीची स्थापना उद्या होणार आहे. परवापासून दीड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न सुरु होणार आहे.

याच ठिकाणी रस्त्याच्या लगत नव्याने मिनी डंपिंग ग्राऊंड तयार झाले आहे. त्याठिकाणी डेब्रीजच्या गोण्या, कचरा, गटारात साचलेला गाळ टाकण्यात आला आहे. त्याठिकाणी कचऱ्याची एक गाडी भंगारात सडत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे उगले यांनी वारंवार मागणी करुन या ठिकाणची पाहणी करण्याची मागणी केली. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

KDMC | garbage
मुख्यमंत्री केजरीवालांवर अण्णा हजारे भडकले- म्हणाले- विचारधारा विसरून सत्तेच्या नशेत दिल्ली सरकार

संबंधित प्रभाग अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी यांचेही दुर्लक्ष असल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उगले यांनी केली आहे. महापालिकेकडून गणोशोत्सवाच्या प भूमीवर 25 ते 31 ऑगस्ट दरम्यन विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेलाही महापालिकेनेच हरताळ फासला असून ही मोहिम कागदावरच राबविली जात असल्याचे या घटनेतून उघड होत असल्याचा आरोप उगले यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com