Kirit Somaiya
Kirit SomaiyaTeam Lokshahi

डोंबिवलीत शिवसेना, राष्ट्रवादीवर निशाणा साधताना सोमय्यांनी पोलिसांनाही दिला इशारा

"बहुमत एकनाथ शिंदेंसोबत आहे त्यामुळे सत्याचाच विजय होणार."
Published by :
Vikrant Shinde

अमजद खान | डोंबिवली: महाविकास आघडीचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याचे अनेकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले होते .याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होणार आणि त्या भ्रष्टाचारी सरकारच्या भ्रष्टाचाराचा स्मारक ग्रीन स्ट्रीट रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाची सुरुवात होणार असा इशारा दिला . किरीट सोमय्या आज डोंबिवलीतील रवींद्र चव्हाण यांच्या नवरात्र उत्सवात भेट देण्यासाठी आले होते .

त्यांना शेख चिल्लीचे स्वप्न बघू द्या:

शरद पवार हे जेव्हा महाराष्ट्रत दौरा करतात त्या दौऱ्या नंतर राज्यात सतत बदल होतो असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले याला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर देत "सत्त्ते शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांना चैन पडत नाही,त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे फक्त पैसे मोजायचं काम आहे ,यावेळी भ्रष्टाचारी लोकांना दूर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाले, आता महाराष्ट्र खऱ्या अर्थात लोकशाही आणि विकासाच्या दृष्टीने पुढे चालला आहे त्यांना शेख चिल्लीचे स्वप्न बघू द्या" असा टोला सुप्रिया सुळे यांना लगवला.

धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळणार:

"आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ,निवडणूक आयोग पण आता न्यायालयाच्या भूमिकेत आहे ,स्पष्टपणे मागचं निवडणूक आयोगाचे कार्यपद्धती पाहिली तर ज्यांच्याकडे बहुमत आहे त्याच्या बाजूने निर्णय होतो ज्याच्याकडे बहुमत असेल तो सगळ्यात जास्त खरा आणि इमानदार पक्ष ,बहुमत एकनाथ शिंदेंसोबत आहे त्यामुळे सत्याचाच विजय होणार."

Kirit Somaiya
डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणारी अदृश्य शक्ती कोण?

संजय पांडे कुठे आहेत ते लक्षात ठेवा:

गेल्या काही महिन्यांमध्ये कल्याण डोंबिवलीत दोन भाजपा कार्यकर्त्यांसोबत मारहाणीचा प्रकार घडले आहेत .याबाबत आज भाजपचे शिष्ट मंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी "पोलिसांना सांगू इच्छितो , बदल्या ट्रान्स्फर साठी लाखो रुपये खर्च केले होते ना , आता ते राज्य संपलेले आहे ,जनतेची सेवा करा,पुन्हा एकदा तीच माफिया गिरी करू नका ,संजय पांडे कुठे आहेत ते लक्षात ठेवा,कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्या ,स्वतःच बँक अकाऊंट काही काळ विसरा" असा इशारा दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com