kirit somaiya medha somaiya
kirit somaiya medha somaiyaTeam Lokshahi

ही आहे भाजपाचे फायरब्रँड नेते ‘किरीट सोमय्या’ यांची लव स्टोरी

Published by :
Saurabh Gondhali

महाराष्ट्रात राजकारणाच्या बातम्या बघितल्या की काही नाव रोज चर्चेत हमखास आढळतात. यात एक प्रमुख नाव असते ते म्हणजे किरीट सोमय्या.(kirit somaiya and medha somaiya) कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे सोमय्या यांना भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही दिवसात त्यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांच्या महाविकास आघाडीला चांगलंच घेरलेलं आहे.

kirit somaiya medha somaiya
Video : 'पाणी नाही, तर विष द्या'; 5 जणांच्या मृत्यूनंतर नागरिकांचा संताप

किरीट सोमय्या सांगतात, मी आधीपासूनच ठरवलेलं कि गुजराती कुंटुबा ऐवजी एखाद्या मराठी मुलीशीच लग्न करायचं. एक तर या मुली नोकरी करायला तयार असतात. नवऱ्याने खूप पैसे मिळवावेत अशी त्यांची काही अपेक्षा नसते. अशीच मुलगी मला मेधामध्ये दिसली. स्वतः चळवळीत काम करत असल्यामुळे, संघ विचारांची पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र देशसेवेला वाहून घेऊ शकत होतो.

kirit somaiya medha somaiya
उर्मिला, आदिनाथची ‘लव्ह स्टोरी’ ची सुरुवात झाली अशी...

दोघे एकत्र काम करू लागले. आंदोलनामुळे सोबतच आर्थर रोड जेलमध्ये गेले. तिथून बाहेर आल्यावर देखील पवई वगैरे भागात ते डेटिंगला जायचे. इंदिरा गांधींच्या विरोधातील आंदोलनातून त्यांचं प्रेम फुललं. पुढे लग्न देखील झालं. किरीट सोमय्या यांनी पूर्णवेळ राजकारण करायचं ठरवलं. मुंबईत जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जबाबदारी त्यांच्या कडे आली. पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर किरीट सोमय्या भाजपमध्ये आले. १९८५ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली.

kirit somaiya medha somaiya
राजकीय पक्षांची सत्तेशी जुळवाजुळव करणाऱ्या प्रशांत किशोरची 'अशी' आहे 'लव्ह स्टोरी'

आज जरी किरीट सोमय्या व मेधा किरीट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असले तरी किरीट यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर मात्र कोणी बोट दाखवू शकलेलं नाही. आजही त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर एक लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी मंत्रीपद देखील भूषवले आहे. या त्यांच्या यशाचं सिक्रेट हे आणिबाणीवेळी सुरु झालेली राजकीय कारकीर्द आणि आर्थर रोड जेलमध्ये सुरु झालेल्या लव्हस्टोरीत लपलंय हे नक्की.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com