संजय राऊतांच्या तोंडाला एचआयव्ही झाल्याची शंका; शिंदे गटाचा पलटवार

संजय राऊतांच्या तोंडाला एचआयव्ही झाल्याची शंका; शिंदे गटाचा पलटवार

जळगावमध्ये उध्दव ठाकरेंची सभा पार पडली. यादरम्यान संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. यावर आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.

मंगेश जोशी | जळगाव : जळगावमध्ये उध्दव ठाकरेंची सभा पार पडली. यादरम्यान संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. जळगावमधील चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली असं नाही, अशा शब्दात राऊतांनी घणाघाती टीका केली होती. या टीकेला आता शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या तोंडाला एचआयव्ही झाल्याची शंका असल्याची खोचक टीका किशोर पाटलांनी केला आहे.

संजय राऊतांच्या तोंडाला एचआयव्ही झाल्याची शंका; शिंदे गटाचा पलटवार
प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणूक लढवणार नाही; पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत

संजय राऊत यांच्या तोंडाला एचआयव्ही झाल्याची शंका उपस्थित करत किशोर पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत आमच्या जीवावर खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना टकले बोलायचा अधिकार कोणी दिला त्यामुळे लायकी सोडून संजय राऊत यांनी बोलू नये व ठिकाणावर राहावं, असा सल्ला देखील किशोर पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

या सभेला उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, असा प्रयत्न चार टकल्यांनी केला. पण, खान्देशची जनता शिवसेनेवर प्रेम करणारी आहे. उद्धव ठाकरे आले, त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. ते आले, त्यांनी पाहिले आणि जिंकले असा हा प्रसंग पाहून आता ते टकले बाहेरच पडणार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. चार गद्दार गेले, दहा निवडून आणू, असा ठाम विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com