फेसबुक लाईव्हवरुन उध्दव ठाकरेंना हिणावले, मग शिंदेंनी का केले? पेडणेकरांचा सवाल

फेसबुक लाईव्हवरुन उध्दव ठाकरेंना हिणावले, मग शिंदेंनी का केले? पेडणेकरांचा सवाल

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देत जनतेशी संवाद साधला. यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. कालपर्यंत उध्दव ठाकरेंना हिणावले आणि तेच आज एकनाथ शिंदे केले. आता लाईव्हची गरज का पडली, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

फेसबुक लाईव्हवरुन उध्दव ठाकरेंना हिणावले, मग शिंदेंनी का केले? पेडणेकरांचा सवाल
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत; दानवेंचं मोठं वक्तव्य

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फेसबुक भाषण झाल्यानंतर चर्चा सुरू आहे की आता शिंदे यांना फेसबुक लाईव्हची गरज का पडली? उद्धव ठाकरे कोरोना काळात जनतेशी लाईव्हद्वारे संवाद साधत होते. तेव्हा त्यांना हिणावले आणि तेच आज एकनाथ शिंदे करत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

कोणाचं अस्तित्व कोणामुळे धोक्यात येत नाही. तुमच्या पक्ष प्रमुखाला वाटलं तेव्हा त्यांनी काय केले होते पाहिलेत. बाळासाहेब स्वतः सांगत होते याचं काय सुरू होते. सरड्याला लाजवेल अशा भूमिका राज ठाकरेंच्या आहेत. लोकांनी मनसेला गृहीत धरलं आहे. सी ग्रेड मधून आलेले A ग्रेड पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

फेसबुक लाईव्हवरुन उध्दव ठाकरेंना हिणावले, मग शिंदेंनी का केले? पेडणेकरांचा सवाल
शिवरायांबरोबरच मोदी, सावरकर, आंबेडकरांचाही फोटो नोटांवर छापा; भाजप आमदाराची मागणी

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी कडूंचे कौतूक केले आहे. राणा दाम्पत्याची नौटंकी सूरू आहे. सी ग्रेड पासून वर येण्यासाठी काय काय सुरू आहे आपण पाहतोय. बच्चू कडू चांगले व्यक्तिमत्त्व आहे. कडू हे राणांना पुरुन उरतील, असे कौतुक त्यांनी केले आहे.

तर, उध्दव ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यात केवळ अर्धा तास पाहणी दौऱा केल्याने शिंदे गटाने त्यांच्यावर टीका केली होती. याला आज पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही रस्त्यावर उतरलोय. उद्धव ठाकरे ही बांधावर गेले होते. शेतकऱ्यांसाठी जे करायला हवं ते नेते करत आहेत. आमचे दौरे घड्याळाच्या काट्यावर मोजत आहात. कमीत कमी आमचे दौरे घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर असे नाहीत, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com