Kishori Pendnekar
Kishori Pendnekar Team Lokshahi

अडीच तास चौकशीनंतर पेडणेकर म्हणाल्या, कर नाही तर डर कशाला...

अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. पण त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली
Published by :
Sagar Pradhan

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. त्याच प्रकरणावरून आज मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिसांकडून सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि चौकशी दरम्यान काय झालं यांची माहिती दिली आहे.

Kishori Pendnekar
निवडणुकीची ट्रायल मॅच होऊनच जाऊ दे; सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पेडणेकर म्हणाल्या की, "पोलिसांचं बोलावणं आलं तेव्हाच मी सांगितलं की तीन दिवस मी बिझी आहे, पण मी येणार चौकशीला. कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. पण त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली." तसंच प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सोमय्यांना लगावला.

पुढे त्या म्हणाल्या की, "ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्यातलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. माझं निवेदन घेऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मूळ शिवसैनिक म्हणून मी त्यांना भेटणार आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे," अशी माहिती सुद्धा त्यांनी माध्यमांना बोलताना दिली.

Kishori Pendnekar
रवी राणांना आता माफ केलं! विनाकारण तोंडात माराल, तर...; बच्चू कडूंचा इशारा

काय केले होते सोमय्यांनी पेडणेकरांवर आरोप?

गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील गाळ्यांबाबत किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर सहा गाळे हडपल्याचे आरोप केले होते. याच प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तीन जणांना अटक देखील करण्यात आले होते. या प्रकरणातही आरोपींच्या जबाबात किशोरी पेडणेकरांचे नाव समोर आले होते. मात्र, जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता खोटे आरोप केले जात असल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com