Lok Sabha Election 2024 | मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची तारीख जाहिर

Lok Sabha Election 2024 | मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची तारीख जाहिर

देशात एकीकडे अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण झाले आहे. अशातच लोकसभा निवडणुकाची संभाव्य तारीख समोर आली आहे.

नवी दिल्ली : देशात एकीकडे अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण झाले आहे. तर, राज्यात मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच लोकसभा निवडणुकाची संभाव्य तारीख समोर आली आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. दिल्ली निवडणूक कार्यालयाचे एक पत्र व्हायरल झाले आहे.

Lok Sabha Election 2024 | मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची तारीख जाहिर
Eknath Shinde On Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

दिल्ली निवडणूक कार्यालयाचे एक पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. या पत्रात लोकसभेच्या निवडणुकीची तारीख 16 एप्रिल सांगण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पत्रानुसार, आयोगाने मतदानाचा दिवस तात्पुरता 16 एप्रिल 2024 असा दिला आहे. संदर्भासाठी आणि निवडणूक नियोजकामध्ये प्रारंभ आणि समाप्ती तारखांची गणना करण्यासाठी असे लिहीले आहे. परंतु, पत्रात नमूद केलेली 'तात्पुरती' तारीख राष्ट्रीय राजधानीत होणार्‍या निवडणुकीच्या टप्प्यासाठी आहे की लोकसभा निवडणुकीची सुरुवातीची तारीख आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले होते. लवकरच लोकसभा निवडणूक लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. तर एप्रिल महिन्याच्या शेवटी लोकसभेच्या निवडणुका होतील, असे विधान अजित पवारांनी केले होते. यानंतर निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com