भीमा सहकारी साखर कारखान्यावर महाडिकांची विजयी हॅट्रिक, विरोधी गटाचा सुपडा  साफ

भीमा सहकारी साखर कारखान्यावर महाडिकांची विजयी हॅट्रिक, विरोधी गटाचा सुपडा साफ

धनंजय महाडिक यांच्यासह भीमा शेतकरी विकास आघाडीचे सर्व 15 उमेदवार विजयी झाले.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी एकहाती विजय मिळवत हॅट्‌ट्रीक साधली आहे. महाडिक यांच्या पॅनेलचे सर्वच सर्व १५ जागा तब्बल साडेसहा हजारांच्या फरक्याने जिंकल्या आहेत. महाडिक यांनी सलग तिसऱ्यांदा कारखाना हाती राखताना ऐतिहासिक विजय मिळविला आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्यावर महाडिकांची विजयी हॅट्रिक, विरोधी गटाचा सुपडा  साफ
आव्हाडांवर झालेल्या विनयभंगाचा गुन्हावर अमृता फडणवीस म्हणाल्या, हे महाविकास आघाडी सरकार...

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. त्यामुळे महाडिक गटाने विरोधकांचा सुफडा साफ केलाय. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना धूळ चारत महाडिक गटाने भीमा कारखान्यावर वर्चस्व राखले आहे. या निडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विश्वराज महाडिक देखील विजयी जाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी निकाल जाहीर केला.

धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत. पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे भगिरथ भालके आणि विठ्ठल कारकान्याचे चेरमन अभिजीत पाटील होते. तर धनंजय महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजन पाटील यांच्या गटात भाजपचे प्रशांत परिचारक होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com