Maharashtra Board Exam Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra Board Exam Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत

मुंबई : सीबीएसईपाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्चदरम्यान होणार आहे.

Maharashtra Board Exam Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
जयंत पाटलांच्या माध्यमातून सांगली बँकेमध्ये अनेक गैरव्यवहार : पडळकर

दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान होतील. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत परिक्षा घेण्यात येणार आहेत.

इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी व दहावीची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com