शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ED कडून आरोपपत्र; अजित पवारांचे नाव वगळले?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात 14 जणांच्या नावांचा समावेश करण्यात आलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव यातून वगळल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात शिंदे गटाच्या एका नेत्याचेही नाव असल्याची माहिती मिळत आहे.
ईडीने या आठवड्यात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात काँग्रेस नेते रणजित देशमुख, राष्ट्रावादीच्या शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यासह अरविंद खोतकर, सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
२०१० मध्ये शिखर बँकने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता. साखर कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी ३२ लाख रुपये, तरीही हा कारखाना अवघ्या १२ कोटी ९५ लाखांना विकण्यात आला. या प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.