सरकार स्थिर, मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

सरकार स्थिर, मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली

अभिराज उबाळे | पंढरपूर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार स्थिर झाले आहे. आता मंत्री मंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची महत्वपूर्ण विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

सरकार स्थिर, मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे; कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अपात्र आमदार निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिल्याने देशातील विधिमंडळाचा सन्मान राखला गेला. आता सरकार स्थिर झाले आहे. मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा आहे. याशिवाय महामंडळ नियुक्त्याही लवकरच होतील. राज्याचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नैतिकता समजून राजीनामा देण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. यावर शहाजी बापू पाटील म्हणालेस देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसाताना राऊत यांची नैतिकता कुठे गेली होती? संजय राऊत आग भडकावायचं काम करतात. घरातून बाहेर पडताना रॉकेलचा डबा आणि काडी पेटी घेऊन निघतात. शिंदे यांच्यावर झालं, आता पवार यांच्यावर टीका करत आहेत, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित निकाल लागला. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. देशात कायदा, संविधान व नियम आहेत. त्याच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. घटनाबाह्य सरकार म्हणून काही लोक स्वतःची पाठ थोपटून घेत होते. त्यांना आज सर्वाच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले आहे, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com