सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून कागदपत्रांचा गोषवारा सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. यानुसार पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने शिंदे व ठाकरे गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितले. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांकडून कागदपत्रांचा गोषवारा सादर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. यानुसार न्यायालयाने चार आठवड्यांचा वेळ दिला असून पुढील सुनावणी आता 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महत्वाचे म्हणजे मतदारांकडूनही एक याचिका आता सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आली असून त्यांच्यांकडून वकील असीम सरोदे बाजू घटनापीठाकडे मांडणार आहेत. यामुळे शिंदे व ठाकरे गटावर मतदार राजाचे काय मत आहे, हेही आता न्यायालयात सादर केले जाणार आहे.

दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत 'खरी शिवसेना कोणाची', याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com