devendra Fadnavis | BMC | BJP | Shivsena
devendra Fadnavis | BMC | BJP | Shivsena Team Lokshahi

महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा, फडणवीसांचं आवाहन
Published by :
Sagar Pradhan

राज्यात कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या दहीहंडी उत्सवात राजकीय मंडळीने चांगलेच राजकीय रंग उधळले. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला, यावेळी त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. सर्व सण आता मोठ्या उत्साहात साजरे होतील, अशी घोषणा काल देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, आज भाजपा मुंबई कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला. या मेळाव्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा नारळही फोडला. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असा निश्चय त्यांनी करत कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलं.

devendra Fadnavis | BMC | BJP | Shivsena
आम्ही गद्दार तर मग तुम्ही...; दीपक केसरकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचांरावर चालणारी शिंदेंची खरी शिवसेना

आज मुंबई येथे भाजपचा ‘लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती’ मेळावा झाला. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन केले. यावेळी आशिष शेलार यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कौतुक केले.

पुढे फडणवीस म्हणाले की, आशिष शेलार हे अनुभवी आहेत. मुंबईत त्यांनी याआधीही अध्यक्ष पद भूषवले आहे. आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. शेलार यांची निवड का केली हे सांगताना फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका युक्तीचा सारांश देत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोणती मोहीम आखायचे त्यावेळी ते एका जवळच्या शिलेदाराची निवड करायचे. आणि म्हणायचे जा आणि मोहीम फत्ते करून ये. तसच केंद्रीय भारतीय जनता पक्षाने आपला शिलेदाराला सांगितले आहे की, जा आणि मुंबईची मोहीम फत्ते करून ये.

मला विश्वास आहे की, मागच्या काळात ही आशिष शेलार यांनी अध्यक्ष असताना मोठी मजल मारली होती. परंतु मागच्या वेळेस सगळी तयारी झाली असताना आपल्या मित्र पक्षामुळे आपण दोन पाऊल मागे आलो. तुम्ही क्रिकेट खेळता आणि जाणता त्यामुळे T20 कशी जिंकायची तुम्हाला चांगलेच माहीत आहे. या निवडणुकीत आपला भगवा महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. भाजप आणि शिवसेना युतीचाच महापौर बनेल पण कुठली शिवसेना ती तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचांरावर चालणारी शिंदेंची खरी शिवसेना अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

devendra Fadnavis | BMC | BJP | Shivsena
देवेंद्र फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची शिष्टाई

तुम्ही कालची मुंबई पाहिली का ?

फडणवीस म्हणाले की, तुम्ही कालची मुंबई पाहिली का? तीच परंपरा, संस्कृती ही आपली परंपरा आहे. आपले सरकार आल्यावर काय घडते हे सर्वांनी पाहिले आहे. आता सर्व जोरात करायचे आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात. आता सर्व जोरात करायचे आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार या आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला. मंगल प्रभात लोढा यांनी तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोनाच्या काळातही चांगल्या अॅक्टिव्हिटी केल्या. एकही दिवस भाजपा शांत बसला नाही. वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं. या मुंबई भाजपाला लोढा यांनी बहुजन आणि सर्वव्यापी चेहरा दिला, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई महापालिकेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, की मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. आपल्या टीमनेही घोटाळे काढले. मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले असते. मुंबईत तेच रस्ते आणि तेच खड्डे असतात. इतर शहरात सिमेंटच्या रस्त्याावर कधीच खड्डे पडत नाहीत. पण मुंबईत खड्डे पडत असतात. मुंबईची अवस्था बदलायची असेल तर प्रकल्प 15 वर्षांपासून सुरू आहे. हे प्रकल्प काही लोकांची दुभती गाय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मलई खाण्याचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com