मोर्चाने नेमकं काय पदरात पडलं? मविआचा ट्विट करत मनोज जरांगेंना सवाल

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. 10 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यावर राजकीय वर्कुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मविआने ट्विट करत मनोज जरांगे पाटील यांना सवाल केला आहे. मविआने ट्विट करत म्हटले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून तुम्हीच आझाद मैदानात जाण्यापूर्वी उपोषण सोडलं, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, गुलाल उधळला, जल्लोष केला.

मोर्चाने नेमकं काय पदरात पडलं? उपोषण का सोडलं? गुलाल का उधळला? आता पुन्हा उपोषण आणि त्यात असली भाषा. काही समजेना राव हे सरकारचं फसवं निर्लज्ज आहे. असे मविआने ट्विट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com