महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' नागपुरात; अजित पवारांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष

महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' नागपुरात; अजित पवारांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष

रविवारी संध्याकाळी नागपुरात मविआची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे.

नागपूर : महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार का? उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर, दुसरीकडे मविआच्या सभेवर वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' नागपुरात; अजित पवारांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष
...आम्ही स्वस्थ बसणार नाही; शिवानी वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

नागपुरात आज मविआची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. अनेक अडथळे पार करून उद्या होत असलेली ही सभा ऐतिहासिक होईल असं मविआच्या नेत्यांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहे. तर, अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत. यामुळे मविआच्या या सभेला अजित पवारांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद सुरू असतानाच शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाने वातावरण तापले आहे. कॉंग्रेसकडून सातत्याने सावरकरांचा अपमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे आज काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com