एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर

एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर

16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडच्या सभेला निघून गेलो असं भुजबळ यांनी म्हटले होते. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

3 फेब्रुवारी 2024 रोजी अहमनदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला. या एल्गार मेळाव्यात भाषण करताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडच्या सभेला निघून गेलो असं भुजबळ यांनी म्हटले होते. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अध्यादेश आणि मसुदा यातला फरक भुजबळ ला कळतो का? अध्यादेश कॅन्सल रद्द झाल्यास मंडल कमिशनचं चॅलेंज करणार. अध्यादेश आणि मसुदा यातला फरक कळत नाही तर, कशाला मंत्री राहतो रे? असा सवाल जरांगे यांनी भुजबळ यांना केला आहे. मंत्री पदाचा राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी हाण आम्हाला तुझं काय करायचंय. अध्यादेश रद्द होऊ दे मग तुझं मंडल कमिशनचं चॅलेंज करतो, मग तुला कळेल मागचा आणि पुढचा दरवाजा कसा असतो.

ओबीसीत घुसलो हाच आम्ही तुझा किती मोठा जोक केला, बजेट मधून आम्ही आरक्षणाची मागणी का केली? हे तुझ्या आता लक्षात आलं. आम्हाला ओबीसीचं वाटोळं करायचं नाही, तुझ्या एकट्यामुळे मंडल कमिशन उडणार असा निशाणाही त्यांनी भुजबळांवर लावला आहे. ओबीसीना कुणीही त्रास देत नाही त्यांना वाटतं मराठ्यांच कल्याण व्हावं असं म्हणत मराठा समाजाकडून ओबीसींना त्रास दिला जात नसल्याचा दावा जरांगे यांनी भुजबळ यांच्या टिकेवर केला असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com