आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या लेकरांचं तोंड पाहणार नाही; मनोज जरांगे पाटील

आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या लेकरांचं तोंड पाहणार नाही; मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मराठा आरक्षण आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेया मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याकडे बैठकीचा मसुदा दिला. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, बैठकीत सरकारनं आरक्षणावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरसकट आरक्षणाचा पत्र जेव्हापर्यंत माझ्या हातात आणि शेवटच्या मराठाच्या हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. आपल्या समाजाच म्हणणं आहे की, आम्हाला आरक्षण आणि तुम्ही पण हवे आहेत. त्यामुळे रात्री उपचार घेतले.फक्त घोषणा दिल्याने आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्याला अभ्यास करून आरक्षण मिळवायचे आहे. जोपर्यंत मराठा समाजातील प्रत्येकाच्या हातात आरक्षण पडत नाही, तसे पत्र माझ्या हातात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com